दिशा लाईव्ह न्यूज -:- ११ नोव्हेंबर २०२४ रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार खोडपे दिलीप बळीराम (सर) यांच्या प्रचारार्थ आयोजित जामनेर येथे जाहीर सभेला जामनेरमध्ये परिसरसतील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
सभेतील आबालवृद्ध, महिला,तरुण बघून उमेदवार खोडपेसर भारावून गेले. त्यांच्यावर असणार प्प्रेमाची साक्ष हा जनसागर देत होता.
काल ११ नोव्हेंबर रोजी जामनेर येथील बोहरा हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते, ज्यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. शरदचंद्रजी पवार साहेब आणि नितेश कराळे मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सभेच्या सुरूवातीस महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित आले होते, जामनेरच्या विविध गावांतील लोक सभेत सहभागी झाले होते. शरद पवार साहेबांनी आपल्या भाषणात जामनेरच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे योगदान आणि भविष्यकालीन योजना उलगडल्या. त्यांनी स्थानिक प्रश्नांवर सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली .आणि नागरिकांना एकसंघ राहण्याचे आवाहन केले.
नितेश कराळे मास्तर यांनी देखील जामनेरच्या विकासासाठी आघाडीच्या संकल्पाची आठवण करून देत, चला जामनेर या घोषणांनी उपस्थितांचा उत्साह वाढवला.
तर जामनेर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खोडपे दिलीप बळीराम यांनी त्यांच्या मनोगतातून जामनेरच्या नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निश्चय व्यक्त केला.
सभेतील वातावरण अतिशय उबदार आणि ऊर्जावान होते. सभेतून वारंवार "खोडपे साहेब,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" "खोडपे सर तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ है!!" अश्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आजच्या सभेला जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
आजची सभा केवळ प्रचाराची नव्हे तर जामनेरच्या विकासासाठी जनतेला दिलासा देणारी ठरली आहे.
दिशा लाईव्ह न्यूज.
संपादक-:-दिनेश चौधरी, लोहारा.
9881028027
बातम्यांसाठी संपर्क साधा--जिल्ह्यातील अग्रगण्य न्यूज चॅनेल!!
सत्य तेच....फक्त दिशा लाईव्ह न्यूज मध्ये.
Post a Comment
0 Comments