कुऱ्हाड प्रतिनिधी -सुनील लोहार
दिशा लाईव्ह न्यूज -:--सध्या महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे .म्हणून राज्यासह जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये,
म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन तर्फे पिंपळगाव येथे आज 15 रोजी सकाळी विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पिंपळगाव पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी, त्यात सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व पि एस आय प्रकाश पाटील व येथील10 पोलीस अंमलदार तसेच मध्य प्रदेश येथील S A P पोलीस प्लाटून कंपनी यांचे 03अधिकारी व 22 कर्मचारी यांच्या सह एकूण पाच अधिकारी व 32 पोलीस कर्मचाऱ्यांसह पिंपळगाव हरेश्वर गावात पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडसाडे रोड ,गोठाणपुरा , डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,बाजारपेठ ,रथ चौक ,सराफ गल्ली, शनी चौक ,कालिंका माता मंदिर चौक, परत पोलीस स्टेशन या मार्गे रूट मार्च काढण्यात आला.
सत्य तेच---फक्त दिशा लाईव्ह न्यूज मध्ये.
अचूक ,निर्भीड, सत्य बातम्या.
संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.
9309918930
Post a Comment
0 Comments