Type Here to Get Search Results !

पहूर नगरीत कार्तिक स्नान पर्वास उदंड प्रतिसाद ! रामप्रहरी होते गंगापूजन ; काकडा आरतीस माता - भगिनींचा उत्साह



दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे,..पहूर , ता . जामनेर ( ता . ५) 

जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले कार्तिक स्नानपर्व मोठ्या उत्साहात सुरू झाले असून काकडा आरतीला माता भगिनींचा उदंड प्रतिसाद लाभत आहे .

         कोजागिरी पौर्णिमे पासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर हा उत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात येतो . प्रतिदिन राम प्रहरी वाघुर नदीचे पूजन केले जाते . गंगेचा अभंग म्हणून ग्रामप्रदक्षिणा घातली जाते .यानंतर  श्री  समर्थ विठ्ठल मंदिरात काकडा आरती केली जाते . 


वारकरी सांप्रदायातील  अबालृद्ध तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने ग्रामप्रदक्षिणेसह काकडा आरती उत्सवात सहभागी होत असून  भल्या पहाटे चैतन्यमय वातावरण निर्माण होत आहे . यशस्वीतेसाठी श्री समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ह . भ . प . विठ्ठल राऊत यांच्यासह सर्व विश्वस्त , भजनी मंडळ ,  ग्रामस्थ भाविकांचे सहकार्य लाभत आहे .

Post a Comment

0 Comments