कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार.
स्थिर सर्वेक्षण पथकाकडून जोगे वडगाव फाटा ,ता. पाचोरा येथे एक लाख बत्तीस हजार रुपयाची रोकड गुरुवारी रात्री जप्त करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 7 रोजी सायंकाळी 7 वाजता पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील वडगांव जोगे फाटा स्थिर सर्वेक्षण पथकाकडून नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी चालू असतांना फगणे जिल्हा धुळे येथील दुचाकीस्वार चालक नामे गौरव बडगुजर वय 35 वर्ष याच्या कडे रोख रक्कम 1,32,940/- रू मिळून आल्याने ही रोकड पाचोरा येथील भरारी पथक क्र 04 चे प्रमुख राजेश बन्सीलाल राठोड कृषी अधिकारी भडगाव यांचे पथक नाक्यावर बोलावून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
तसेच ही रक्कम यांच्या ताब्यात देण्यात आली . विधानसभा निवडणुक रणधुमाळी संदर्भातील गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी कारवाई असून पोलीस पथक या ठिकाणी ठाण मांडून आहे.
तसेच पिंपळगाव हरे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे देखील कर्मचाऱ्यासोबत दररोज रात्री एक ते चार दरम्यान या ठिकाणी तपासणी नाक्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत.
सदर कारवाई हि स्थिर पथकातील वडगांव जोगे येथील पोलिस कर्मचारी मुकेश तडवी, मनोज बडगुजर तसेच पिंपळगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश काळे, पोलीस राहुल बेहरे,अमोल पाटील,भारत पाटील, चालक दिपक आहिरे यांनी नाकाबंदी दरम्यान केली .
दिशा लाईव्ह न्यूज.
सत्य तेच.....
संपादक :-: दिनेश चौधरी, लोहारा.
9309918930
Post a Comment
0 Comments