चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबोळे शिवारात शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्या आला. बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून शेतातील मजुरांनी गावाकडे धाव घेतली. यातील एक तरुणी घराकडे धावत सुटली.
मात्र घाबरलेली तरुणीने विहिरीत उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. पाणी जास्त असल्याने यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दि. १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे.
चाळीसगाव ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारांमध्ये अजूनही बिबट्याचे दर्शन होत आहे.
याच दरम्यान तालुक्यातील तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी स्नेहल देखील होते. सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (वय १८) ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती.
तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली. मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिने विहिरीत उडी घेतली. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. पाटणा तांडा येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण याना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
Post a Comment
0 Comments