दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . १ ) पहूर येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राचा परिसर चकाचक झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
पहूर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते . आजूबाजूचा परिसर गवत आणि झुडपांनी वेढल्या गेला होता . त्यामुळे शवविच्छेदन केंद्राकडे जाता -येता मयतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता . या समस्येचे वृत्त ' दिशा लाईव्ह न्यूज ' ने प्रसिद्ध करून संबंधितांचे लक्ष वेधले होते .
या वृत्ताची दखल घेत संबंधित यंत्रणेने शवविच्छेदन केंद्राचा परिसर स्वच्छ केला . त्याबद्दल रुग्णांसह नातेवाईकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे .
Post a Comment
0 Comments