दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . २ ) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे . महायुतीतर्फे 'होम टू होम 'प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे तर महाविकास 'आघाडी सोशल मीडिया 'च्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहे .
सध्या दिवाळीचा उत्सव असला तरी निवडणुकीचे वेध लागल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत . आपल्या उमेदवाराची 'भूमिका 'पत्रकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भर आहे . तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करताना दिसून येत आहेत .
खरंतर दसरा झाला म्हणजे शेकोट्या पेटू लागतात थंडी वाढू लागते . मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण हिवाळ्यातही तापणार असल्याचे दिसत आहे .
सर्वसामान्य मतदार दिवाळीच्या फराळा बरोबरच तटस्थपणे निवडणूक प्रचाराचाही आस्वाद घेताना दिसत आहे .निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल तथा पोलीस प्रशासन कामाला लागले असून जिल्हा व राज्य सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे .
Post a Comment
0 Comments