कुऱ्हाड प्रतिनिधी -:- सुनील लोहार
दिशा लाईव्ह न्यूज -:- पाचोरा तालुक्यातील एक धार्मिक वारसा लाभलेल्या पिंपळगाव हरेश्वर गाव हे विधानसभा निवडणुक उमेदवारांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे.
सध्या सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरू असून पाचोरा भडगाव मतदार संघात राजकीय पक्षासोबत ,अपक्ष एकूण बारा उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.आणि समर्थ गोविंद महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला जास्तीतजास्त मतदान कसे मिळेल यासाठी ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ पिंपळगाव हरे येथून होत आहे.
म्हणजेच ग्रामीण मतदारांसाठी हे गाव केंद्रबिंदू ठरत आहे.
पाचोरा तालुक्यातील एक मोठ्या लोकसंख्येचे हे गाव आहे .या गावाला समर्थ गोविंद महाराजांची प्रती पंढरपूर म्हणून तसेच या गावात प्राचीन काळातील हरिहरेश्वरचे महादेव मंदिर आहे .म्हणून या पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्वच उमेदवार त्यात महायुतीचे किशोर पाटील ,महविकास आघाडीच्या वैशाली सूर्यवंशी ,अपक्ष उमेदवार नीलकंठ पाटील,दिलीप वाघ,अमोल शिंदे,प्रताप पाटील यांनी गोविंद महाराज व हरिहरेश्वर मंदिरात आशीर्वाद व विजयासाठी आपापल्या परीने साकडे घालून प्रचाराचा शुभारंभ करून ,विविध शक्तिप्रदर्शन त्यात दुचाकी रॅली, प्रचार सभा,घरोघरी प्रचार अशा तऱ्हेने शुभारंभ करीत आहेत.
Post a Comment
0 Comments