दिशा लाईव्ह न्यूज-देवेंद्र पारळकर,शेंदूर्णी, -:- प्रति पंढरपुर नगरी म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या शेंदुर्णी येथील संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी प्रारंभ केलेला विठ्ठल रुक्मिणी रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा उद्या दि.१५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी शहरातील मुख्य मार्गावरुन निघणार असुन यानिमित्ताने सोन नदीच्या काठावर भव्य यात्रा भरली आहे.रथोत्सवाचे यंदाचे २८० वेळ वर्षे आहे.उत्तर महाराष्ट्रातील यात्रेला याच यात्रेपासुन प्रारंभ होत असतो.
आता गुरुवारी रात्री रथाच्या आदल्या दिवशी सुंदर आकर्षक विद्युत रोषणाई करुन पालखी सजविण्यात आली आहे.पालखीच्या अग्रभागी पारंपरिक वाद्ये, भजनी मंडळी, पालखीचे सोबत मशालवाले संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे ८ वेळ गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांच्या समवेत भालदार चोपदार जे असेच वंशपरंपरेने चालत आलेली सेवा देत आहे.रथाच्या घरापासुन कडोजी महाराज मंदिर,श्री.त्रिविक्रम मार्गाने पुढे श्री.त्रिविक्रम मंदिरात प्रवेश करते तिथे आरती केली जाते.शहरातील परंपरेनुसार ठरलेल्या मार्गाने पालखी निघते ठराविक ठिकाणी विसावा घेते.जागोजागी भाविक पालखीचे मनोभावे पुजा करतात दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते.
गावात जशी पालखी मार्गक्रमण करत असते तसेच विविध भागातील मंदिरात दर्शन घेऊन दुसऱ्या प्रदक्षिणा मार्गाने पुन्हा रथाचे घर, दत्त मंदिर चौक वाडी दरवाजा तेथील हनुमान मंदिर खाली मग नदीतुन आठवडे बाजार ज्यास आखाजी सुद्धा संबोधले जाते तेथुन गांधी चौकात जाऊन रथाचे घरी सांगता होते.परंपरागत ठरलेल्या ठिकाणी सुद्धा पालखीचं स्वागत अगदी उत्साहाने केले जाते.नगरप्रदक्षिणा रात्रभर सुरू असते अतिशय धार्मिक असलेल्या शेंदुर्णी नगरीत सगळ्याच संतांच्या जयंती पुण्यतिथी सगळेच सण उत्सव, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, श्रीराम जन्मोत्सव सोहळा,संत रुपलाल महाराज पुण्यतिथी कीर्तन सप्ताह,वर्षभर मग गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कार्तिक महिन्यात होणारी काकडा आरती,
गेल्या १५ वर्षापासुन भल्या पहाटे अखंड सुरू असणारी प्रभात फेरी,दर एकादशीला होणारे कीर्तन,विष्णु सहस्त्रनाम येथे सोयगाव येथील प.पु.नाईक गुरुजी दादा यांनी सुरू केलेली परंपरा आज एरंडी येथील सुधीर कुलकर्णी यांनी सुरू ठेवली आहे.दर गुरुवारी आणि एकादशीला श्री.संत गजानन महाराज यांची बावन्नी, मोठ्या प्रमाणावर सुरू असणारा प्रगटदिन, स्वामी समर्थ यांच्या केंद्रात होणारे धार्मिक कार्यक्रम,संत आसाराम बापुंच्या शिष्य परिवाराकडुन राबविण्यात येणारे धार्मिक सोहळे उपक्रम, सद्गुरू परिवाराच्या श्री.ची बैठक, नवरात्रोत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे निघाणारी दुर्गामाता दौड, डिसेंबर महिन्यात २१ ते २३ रोजी होणारी व्याख्यानमाला तसेच असंख्य धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सतत होत असतात.
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणाला कुणासोबत बोलायला वेळ नाही.वेळ मिळाला थोडाफार तर तो मोबाईल असतोच त्यामुळे संवाद हरवत चाललाय, वाचनसंस्कृती लोप पावत आहे.जुन्या परंपरा आणि उत्सव मात्र आजही शेंदुर्णी येथे कायम आहे मात्र अजुन नागरिक भाविक यांचा अधिक सहभाग आवश्यक आहे.
खान्देश चे प्रति पंढरपुर असलेल्या या नगरीचे आपलं वैशिष्ट्ये जपलं आहे.
उद्या रथोत्सव आहे व यात्रोत्सव सोहळा तेव्हा सगळ्यांनी यासाठी उपस्थित रहावे सहभागी व्हावे असे आवाहन समस्त शेंदुर्णी वासीयांच्या वतीने आपल्याला करत आहे.आपले शेंदुर्णी नगरीत सहर्ष स्वागत आहे.
भगवान श्री त्रिविक्रम महाराज की जय
संतश्रेष्ठ कडोजी महाराज की जय
जय श्रीराम.
ॲड.देवेंद्र गोविंदराव पारळकर
चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी.
Post a Comment
0 Comments