Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयाचे यश! माहेश्वरी धनगर , देवेश सोनवणे ला रौप्य पदक तर मोहीनी राऊत , प्रांजली धनगर , भावेश निकम यांना कांस्य पदक


                            दिशा लाईव्ह न्यूज.


शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १ )

पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाने राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली आहे .         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे  व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो  स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे   येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .

     या स्पर्धेत पहूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या  विद्यार्थिनी माहेश्वरी धनगर  ( ९ वी ) देवेश सोनवणे    ( १० वी ) याने रौप्य पदक प्राप्त केले तर मोहिनी राऊत  ( ६ वी ) भावेश निकम (९ वी ) प्रांजली धनगर (१० वी ) यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले .

        क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले सुनिल पवार यांचे सहकार्य  .यशाबद्दल संस्थाध्यक्ष बाबुराव घोंगडे , सचिव भगवान आण्णा घोंगडे सर्व संचालक मंडळ , जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , पर्यवेक्षक के.ए. बनकर जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे सचिव अजित घारगे  तालुका क्रीडा समन्वयक प्रा . आसिफ खान , भूषण मगरे, ईश्वर क्षिरसागर  यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments