Type Here to Get Search Results !

मेंढपाळ बांधवांची दिवाळी वाड्यावरच झाली साजरी ! नाशिक जिल्ह्यातून शेकडो वाडे जळगाव जिल्ह्यात दाखल मेंढरांच्या सेवेतच आमची दिवाळी - मेंढपाळ भगिनींची कृतार्थ भावना !



             ग्राउंड रिपोर्ट !


शंकर भामेरे

पहूर , ता . जामनेर ( ता १ ) 

कसली दिवाळी आणि कसला सण ?  मेंढरांची सेवाच आमची दिवाळी . . . या कृतार्थ भावना आहेत नाशिक  पहूर शिवारात आपल्या बिऱ्हाडासोबत आलेल्या मेंढपाळ भगिनींच्या . दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ' दिशा लाईव्ह न्यूज '  ने  थेट बिऱ्हाडच गाठले .

       ऊन वारा पावसाची तमा न बाळगता मेंढपाळ बांधव रानोमाळ भटकंती करत आपल्या जित्राबांसाठी अहोरात्र कष्ट उपसत असतात .सगळीकडे दिवाळीचा झगमगाट आणि सुग्रास फराळाचा घमघमाट दरवळत असताना ' दिशा लाईव्ह न्यूज 'ने मेंढपाळ बांधवांच्या वाड्यावरील दिवाळीचा वेध घेतला असता त्यांच्या कृतार्थ भावना समोर आल्या . याप्रसंगी  भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते ईश्वर दिवाळे यांनी मेंढपाळ बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .



  " आमचे सण - वार आम्ही वाड्यावरच साजरे करतो . रात्रीच्या अंधारात विंचू तथा जंगली श्वापदांचाही धोका असतो . पण हे सगळं आमच्या जित्राबांसाठी आम्ही पिढ्यान पिढ्या करत आलो आहोत . "

बारकू तुळशीराम सरोदे

मेंढपाळ .

नांदगांव जि  .नाशिक


      "नाशिक जिल्ह्यातील नांदगाव भागातून शेकडो मेंढपाळ कुटुंब पाऊस सरला म्हणजे चाळीसगाव ,  पाचोरा , जामनेरकडे मार्गस्थ होतात .  

आमची दिवाळी वाड्यावरच साजरी होते . "

गोरख बळीराम ठोंबरे

नांदगाव , मेंढपाळ .


आमच्या कपाशीच्या शेतात मेंढपाळ बांधवांचे २ वाडे आलेले असून आम्ही त्यांना चांगले सहकार्य करतो . 

गोविंदा सखाराम घोंगडे ,

शेतकरी पहूर - कसबे


https://youtu.be/b4FKzpiR12w?si=zRwv3PzEh6w4MUMu

*मेंढपाळ बांधवांची दिवाळी !! व्यथा जीवनाची..*


*व्हिडीओ बघा!!-आवडल्यास लाईक करा.*

*दिशा लाईव्ह न्यूज.*

*संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.*✍️


Post a Comment

0 Comments