Type Here to Get Search Results !

जुन्या आठवणींना उजाळा देत कुऱ्हाड येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात!! शाळेत सीसीटीव्ही साठी केली या विद्यार्थ्यांनी पंचवीस हजार रुपयाची मदत .

 


कुऱ्हाड प्रतिनिधी  -:-सुनील लोहार.

 कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या सन 2004 च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले .

येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात  या माजी विद्यार्थ्यांची एक प्रकारे एकदिवसीय शाळाच भरलेली होती. कार्यक्रमात सन2004 च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी हजेरी लावली होती. या  विद्यार्थ्यांमध्ये कोणी  मोठा शहरांमध्ये  व्यवसायाच्या निमित्ताने तर कोणी शासकीय व खाजगी सेवेत कार्यरत आहेत.स्नेहसंमेलनाचे निमित्ताने हे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्यांनी शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 25000 ची सामुदायिक मदत केली. या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस एम पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे आभार मानले. 



तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक तथा आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एस एम पाटील ,मा.मुख्याध्यापक माधव घोंगडे, एकनाथ सुरवाडे ,विमल वानखेडे, माया देशमुख, अविनाश पाटील ,सुधाकर माळी ,राजेंद्र माळी सुहास  मोरे,शरद महाजन,संदीप पाटील आदी शिक्षकानी आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यानं मार्फत त्यांचा  शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी शाळेतील दिवंगत शिक्षक व विद्यार्थी यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतसाठी संदीप तेली,डॉ.विजय चौधरी,रवींद्र जाधव,ज्ञानेश्वर बेलदार,अमर घोंगडे,अमोल पाटील,विष्णू चौधरी,सतीश भगत,श्रीकृष्ण गायकवाड,अर्चना पाटील,सुवर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले,

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद तेली तर  आभार भारती पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments