Type Here to Get Search Results !

वडगाव जोगे फाटा येथे वीस लाख रुपयाची रोख रक्कम जप्त!!. पिंपळगाव हरे.पोलिसांची सर्वात मोठी कारवाई पंधरा दिवसातील चौथी कारवाई


कुऱ्हाड प्रतिनिधी -सुनील लोहार

कुऱ्हाड ता.पाचोरा येथून जवळच असलेल्या 

  जोगे वडगाव फाटा येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वीस लाख रुपयाची रोकड रविवारी रात्री आठ वाजता जप्त करण्यात आली.

 दिनांक 17  रोजी रात्री पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन हद्दीतील  वडगांव जोगे फाटा  स्थिर सर्वेक्षण पथकाकडून  नाकाबंदी  दरम्यान  वाहन तपासणी चालू असतांना चारचाकी वाहन चालक  मुझहिद रशीद देशमुख  रा.पाचोरा  याच्या कडे  रोख रक्कम वीस लाख रू  मिळून आल्याने ही रोकड  पाचोरा येथील भरारी  पथक क्र 04 चे प्रमुख राजेश बन्सीलाल राठोड, कृषी अधिकारी भडगाव यांचे पथक नाक्यावर बोलावून पुढील कारवाई करण्यात आली  आहे.


तसेच ही रक्कम यांच्या ताब्यात देण्यात आली . विधानसभा निवडणुक रणधुमाळी संदर्भातील गेल्या पंधरा दिवसातील पोलिसांची  ही  चौथी कारवाई असून  पोलीस पथक या ठिकाणी ठाण मांडून आहे.तसेच पिंपळगाव हरे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे देखील कर्मचाऱ्यासोबत  दररोज रात्री या ठिकाणी तपासणी नाक्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत.



सदर कारवाई  हि  स्थिर पथकातील वडगांव जोगे येथील पोलिस कर्मचारी मुकेश तडवी, मनोज बडगुजर   तसेच पिंपळगाव पोलिस स्टेशन  चे  सहाय्यक पोलीस निरिक्षक  प्रकाश काळे,  यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

सदर पुढील तपास भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

Post a Comment

0 Comments