Type Here to Get Search Results !

पहूर येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या शिवनगर परिसरावर शोककळा -विधवा मातेने फोडला हंबरडा!!

!



दिशा लाईव्ह न्यूज -:-  पहूर , ता . जामनेर ( ता . १५ )  

 राहत्या घरात गळफास घेऊन शेतमजूर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शिवनगर येथे आज शुक्रवारी ( ता . १५ ) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली .

         गोकुळ दिलीप सोनार हा २८ वर्षीय तरुण आई आणि मोठ्या भावासोबत शिवनगरात वास्तव्यास होता . 

            शेतातून घरी आला आणि संपवले जीवन -


     गोकुळ सोनार हे दुसऱ्यांची शेती जूपीने करत होते . कपाशीचा हंगाम संपल्याने कपाशी उपटून रब्बी हंगामात ज्वारी पेरण्यासाठी  त्यांची तयारी सुरू होती . आज सकाळी आई आणि मोठ्या भावासोबत ते शेतात गेले . उपटलेली कपाशी ओली असल्याने ती पेटविण्यासाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणतो असे सांगून ते शेतातून घराकडे निघाले . मात्र एवढा वेळ का होतोय ? असे मोठ्या भावाने फोन करून विचारले असता फोन न लागल्याने मोठा भाऊ गजानन यांनी शेजारच्यांनी संपर्क साधला असता त्यांना लहान भावाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली . गोळूळ सोनार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . डॉ . मयूरी पवार यांनी तपासणी अंती मयत घोषित केले .ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . वैद्यकीय अधिकारी डॉ . मयुरी पवार यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भरत लिंगायत पुढील तपास करीत आहेत . सायंकाळी पाचला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

             विधवा मातेने फोडला हंबरडा

लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या गोकुळला  आईने व मोठ्या भावाने चांगले शिक्षण दिले . गोकुळ शेतीसह शेततळ्यांची कामे करीत असे . त्याने दहा-बारा तरुणांना शेततळ्यांच्या कामात रोजगार उपलब्ध करून दिला होता . मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गोकुळच्या अकाली जाण्याने शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Post a Comment

0 Comments