Type Here to Get Search Results !

बालकांच्या भावनांशी नातं जोडूया : बालरक्षक शंकर भामेरे





 दिशा लाईव्ह न्यूज-पहूर , ता . जामनेर ( ता . जामनेर )  बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास  साधण्यासाठी पालक तसेच शिक्षकांनी त्यांच्या भावनांशी  नातं जोडावयास हवे असे प्रतिपादन बालरक्षक शंकर भामेरे यांनी केले . महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आयोजित बालदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते . 

   प्रारंभी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका व्ही .व्ही .घोंगडे यांच्या हस्ते देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . याप्रसंगी बालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . 

    पुढे बोलताना श्री . भामेरे  म्हणाले की , लहान मुलं निरागस असतात . त्यांच्यावर जसे संस्कार होतील ,  तसेच त्यांचे व्यक्तिमत्व घडते .  मुलांच्या भावविश्वाला गवसणी घालत पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा . 

त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करावयास हवे .

 प्रत्येक मूल शिकू शकते ,हा विश्वास महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी उद्याचे नेतृत्व असणाऱ्या बालकांनी न्यायाच्या मार्गावर चालण्याची गरज व्यक्त करताना "इन्साफ की डगर पे ,  बच्चो दिखाओ चलके । यह देश है तुम्हारा ,  तुम ही हो कलके । "

या काव्यपंक्ती सादर केल्या . 

याप्रसंगी पर्यवेक्षिका के .ए . बनकर  , हरिभाऊ राऊत यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते . सूत्रसंचालन  करून बी .एन . जाधव यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments