दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १३) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक मतदारास मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी बीएलओ शिक्षकांकडून घरोघर जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे .
पहूर कसबे येथील लेले नगर भागात बीएलओ शिक्षक महेश मोरे हे घरोघर जाऊन मतदारची चिठ्ठ्यांचे वाटप करीत आहेत .
येत्या २० नोव्हेंबर रोजी आपणास नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर जाऊन सर्व मतदारांनी निर्भीडपणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचे कर्तव्य बजवावे , असे आवाहन मानव अधिकार संरक्षण समितीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी शंकर भामेरे यांनी केले .
Post a Comment
0 Comments