दिशा लाईव्ह न्यूज -देवेंद्र पारळकर,शेंदूर्णी। --::-- खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या शेंदुर्णी येथील संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या विठ्ठल रुक्मिणी रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.यंदाचे हे २८० वेळ वर्षे आहे.
काल 12 रोजी कार्तिकी एकादशीला सकाळी संत कोंडोजी महाराज यांच्या मंदिरात विधीवत पुजा करण्यात आली.भालदार चोपदार तसेच भाविकांच्या सह पारंपरिक शहरात मिरवणुकीने श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात डबी बसवण्यात आली.
सोन नदीच्या काठावर संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या समाधी जवळ संस्थानचे ८ वेळ गादी वारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सकाळी श्री.त्रिविक्रम मंदिरात ह.भ.प.पारस महाराज जैन बनोटीकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले.रात्री नगरप्रदक्षिणा करण्यात आली.
खान्देश चे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या शेंदुर्णी नगरीचे वैशिष्ट्ये म्हणजे राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सहकार राजकीय क्षेत्रातील दिग्गज या मुलीने दिले आहे.धार्मिक क्षेत्रात संतश्रेष्ठ कडोजी महाराज, हरिप्रसाद महाराज,माधव बाबा, सांस्कृतिक क्षेत्रात मराठ्यांचे संग्राम गीते लिहिणारे दु.आ.तिवारी, कीर्तनकार प्रवचनकार ग्रंथकार कवी लेखक वक्ते संतकवितलक वै.भिमराव मामा पारळकर राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील पहिल्या महिला सरपंच भागिरथी बाई गरुड, आप्पासाहेब रघुनाथराव गरुड, काकासाहेब साने, आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड तसेच असंख्य नररत्ने या गावात होऊन गेले आहे.
आजच्या काळात सुद्धा धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत असते.सर्व संतांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येते.शतकोत्तर परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा, विविध भागवत सप्ताह तसेच दर एकादशीला कीर्तन,१७ वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेली प्रभातफेरी व कार्तिक महिन्यात भल्या पहाटे श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात होणारी काकडा आरती व यानिमित्ताने भाविकांनी भरणारे मंदिर, यावेळी भजनात तल्लीन होणारे भाविक हा सोहळा खरच अनुभवायला हवा.दर एकादशीला व गुरुवारी होणारी संत गजानन महाराज यांची बावन्नी यामुळे शहरातील धार्मिक परंपरा आजही कायम आहेत.वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ वारकरी महिला भजनी मंडळ यांची यावेळी मोठं योगदान आहे.
शेंदुर्णीचा रथोत्सव व यात्रोत्सव
यंदाचे २८० वेळ वर्षे आहे.आता आपल्या गावात सहज सगळं काही दुकानात मॉल मध्ये मिळतं, मोबाईल,टी.व्ही.मुळे चित्रपट टॉकीज सुद्धा बंद झालेल्या आहेत . फोटो स्टुडिओ, हॉटेल्स करमणुकीचे खेळ आता यात्रेत हळुहळु कमी होत आहे.मात्र काही वर्षापुर्वी यात्रा म्हणजे पर्वणीच असायची खान्देशातील शेंदुर्णी च्या यात्रेपासुन यात्रा सुरू होतात.
दिवाळीच्या निमित्ताने शेंदुर्णी येथील लेकी एकवेळ माहेरी येत नाही मात्र रथोत्सवाला हमखास येतात तसेच नोकरी व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेला शेंदुर्णीकर सुद्धा यावेळी आपल्या गावी येणारच . रथाच्या आदल्या रात्री निघणाऱ्या नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा भल्या पहाटे सुद्धा येणारी पालखी बघण्यासाठी पालखी मार्गावर जागेची असणारे भाविक नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी आतुर सकाळी मग रथाच्या घराजवळ भाविक नागरिक दर्शन घेण्यासाठी गर्दी करायचे.
विधीवत पुजा आरती झाल्यावर सुंदर झेंडुच्या फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या रथ मोठ्या डौलाने हळुहळु भगत परिवारातील सदस्य रथाला मोगरी लावण्याचे कठीण कार्य अतिशय मेहनतीने कष्टाने करतात यामुळे रथाला न ओढता सुद्धा तो मार्गक्रमण करत असतो.दोन तीन ठिकाणी मात्र रथाचे दोर मोकळे केले जातात.यावेळी भाविक मोठ्या उत्साहात भगवान त्रिविक्रम महाराज की जय आणि कडोजी महाराज की जय यांच्या जयघोषात चढण सुद्धा रथ सहजपणे पार करतो.या रथावर केळी वाहण्याची प्रथा आहे पुजा करुन नारळ नारळाचे तोरणं बांधले जातात.कानगी दिली जाते.नवसाला पावणाऱ्या या रथाचे दर्शन घेण्यासाठी खान्देश मराठवाडा आणि विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात.अस शेंदुर्णी गावात पायी मोटारसायकल वर जाणं म्हणजे सुद्धा मोठं दिव्य असतं एवढ्या अरुंद रस्ते आहेत मात्र एवढा मोठा रथ मात्र दिमाखात मोठ्या उत्साहात फिरतो आहे.
यात्रेच्या जुन्या आठवणी खरच खुप छान आहे.नदीच्या काठावर ओळीने तीन चार फोटो स्टुडिओ असायचे यात कृष्णधवल छायाचित्र काढले जायचे मग काही वेळाने तेथील पेंटर आपल्या कलेच्या माध्यमातून त्यात रंग भरायचे की झालं रंगीत फोटो तयार , मोटारसायकल, चंद्र यांच्या वर बसलेले जुने फोटो अजुन सुद्धा काहींच्या संग्रही आहेत.हॉटेल सुद्धा ओळीने चार पाच भावसार बंधुंच्या हॉटेल मध्ये भक्त पुंडलिकाची मुर्ती विराजमान करण्यात येत असे यात्रेतील खास मागणी असलेले भजे जिलेबी आणि रेवड्या शेव मुरमुरे हे पंचपक्वान्न, पुढे मग करमणुकीचे वेगवेगळ्या लाकडी पाळणे,मौत का कुवा व ओळीने असणाऱ्या टुरिंग टॉकीज व भल्या पहाटे पर्यंत सुरू असणारे लोकनाट्य तमाशा मंडळे.बरेच जुनी मंडळी आजही सांगतात की आम्ही संध्याकाळी ६ चार पिक्चर बघायला गेलो की सकाळी ३ ते ६ चार पिक्चर बघुनच घरी यायचो.भांड्याची दुकाने सुद्धा ओळीने तिथं संसारोपयोगी सगळ्या वस्तु हमखास मिळणार, करमणुकीचे साधन तेव्हा खुप कमी होते यामुळे यात्रा म्हणजे हमखास ठिकाण वर्षातील ते पंधरा वीस दिवस खुप मंतरलेले असायचे आज मात्र सगळंच बदललं आहे.आवडी करमणुकीचे माध्यमं, मोबाईल मुळे तर आपण व्यक्तिकेंद्रित झालो आहे.खेळ , संवाद कमी झाला आहे.टुरिंग टॉकीज मध्ये जमीनीवर मातीत बसुन चित्रपट बघायची मजा, घरुन आणलेले पोतं ,गोधड्या वर बसुन बघीतले ले चित्रपट मध्ये मग इंटरव्हला लाईट लागले की लिमलेटच्या गोळ्या,पोंगे,खारे शेंगदाणे यांची चव अजुनही जिभेवर रेंगाळत आहे.
आजही जग बदलतंय आपण कितीही बीझी झालो आहे तरीही शेंदुर्णी येथील परंपरा उत्सव आज सुद्धा परंपरागत अव्याहतपणे सुरू आहे.यासाठी सगळ्यांचेच योगदान सहकार्य आहे.१५ नोव्हेंबर रोजी २८० वा रथोत्सव व यात्रोत्सव सोहळा संपन्न होणार आहे तेव्हा सगळ्यांनी आवर्जुन यासाठी उपस्थित रहावे ही विनंती आहे.
भगवान त्रिविक्रम महाराज की जय........
संतश्रेष्ठ कडोजी महाराज की जय..........
जय श्रीराम .............
ॲड.देवेंद्र गोविंदराव पारळकर
चालक -श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी.
दिशा लाईव्ह न्यूज--
9881028027
9309918930
Post a Comment
0 Comments