Type Here to Get Search Results !

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात--6000/00 दराने कापूस खरेदी..कापसाला 10 हजार तरी भाव द्यावा..शेतकऱ्यांची मागणी!!-कापूस प्रश्नावर सरकारची दातखीळ बसली का?-शेतकऱ्यांचा आक्रोश!!

 


                         भीषणता शेतकऱ्यांनाची--

दिशा लाईव्ह न्यूज -:- सध्या  विधानसभेचे राजकिय वातावरण खूपच तापले आहे. ज्याला त्याला त्याची पडली आहे. मात्र..विकास कामांच्या वलग्ना करणाऱ्यांनी या 3 वर्षात शेतकऱ्यांना काय दिले?  कोणत्या शेती मालाला योग्य भाव मिळाला?  जवळपास 3 वर्षापासून कपाशी ,मका,केळी ,ज्वारी या पिकांना मातीमोल भाव आहे.

इकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत ,तर शेतकऱ्यांना शेतात मजूर मिळेनासा झालाय!!

उघड डोळे---बघा नीट.


2013 मध्ये कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला जात  होता ,आणि 2024  लाही   कापूस 5500 ते 6000- रुपये प्रति क्विंटल विकला जात  आहे... फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 /00 रुपया ला एक बॅग होती. आज 1400/00  रुपया ला एक बॅग आहे, 

तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3  प्रतिकिलो रुपये किलो होती. आजरोजी  12 ते 15 रुपये  प्रतिकिलो आहे. सर्वसामान्य जनता तेव्हा  तेव्हा 390 /00  रुपया ला गॅस भरत होता .आज आज 1100 ते 1200 ला झालाय...

2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते. आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 11 लाख लागत आहे. तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 55000 हजाराच्या झालाय,  आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 60 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते. आज तिचं गाडी 1,10,000 वर नेऊन ठेवली आहे.  पेट्रोल  सरासरी 105 ते110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला,gst या गोंडस नावाखाली करवसुली जोरात चालू आहे.

   धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी काही राजकिय मंडळी मुग गिळून गप आहेत. अवैध धंदे गावागावात जोरात चालू आहे.

 वरील सर्व वाढलेल्या किमतींच्या मानाने आज कापसाला काय भाव असावा. सांगा ना आता का दातखिळी बसली.

खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव.शेतकरी त्रस्त!!

शेतकऱ्यांनाच वाली कोणी नाय र..


Post a Comment

0 Comments