Type Here to Get Search Results !

गावठी हातभट्टी वर टाकलेल्या धाडीत सुमारे 35 हजार रुपये किमतीच्या दारू वर पिंपळगाव पोलिसांचे धाडसत्र.


कुऱ्हाड प्रतिनिधी -:- सुनील लोहार 

पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे गाव  परिसरातील नाल्यात गावठी हातभट्टीवर पोलिसांनी मंगळवारी दुपारी धाडसत्र राबविले.

 दिनांक 5 रोजी दुपारी  पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वरसाडे रोड लगत असलेल्या नाल्यात झाडाझुडपाच्या आडोश्याला आरोपी  नामे युनूस भिकन तडवी वय 57 वर्ष राहणार पिंपळगाव हरेश्वर हा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने घटनस्थळावर पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्री.प्रकाश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसत्र राबविले  असता याठिकाणी 200 लिटर मापाचे 5  पत्री व प्लास्टिकचे ड्रम मध्ये अंदाजे किंमत 35,000/- ची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे  व पक्के रसायन मिळून आले.



जागेवर पंचनामा करून या रसायनाचा निरिक्षणासाठी नमुना घेऊन  इतर मुद्देमाल त्यात  प्लास्टिक व पत्री ड्रम जागेवर नष्ट करण्यात आले . सदर आरोपी विरुद्ध मुंबई अधिनियम दारू बंदी कायदा गु. र.नंबर 293/2024  कलम 65 फ प्रमाणे कारवाई करण्यात आली . सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, ग्रेडेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील , पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरपगारे  ,अमोल पाटील व इम्रान पठाण यांनी केली.

 सद्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने , कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पिंपळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई सत्र सुरूच ठेवावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments