दिशा लाईव्ह न्यूज....सत्य तेच!!
दिशा लाईव्ह न्यूज --::---पाळधी ता.जामनेर :- मैत्री जीवनाला सुंदर करणारे अधभूत रसायन म्हणजे मैत्री आयुष्याचा प्रवास सुसह्या करणारी पाऊलवाट.मैत्री म्हणजे अतुट विश्वास.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही मैत्री अधिक दूढ करण्यासाठी सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञानाचा तितक्याच चपखलपणे वापर होताना दिसून येत आहे.
अशाच २००८ मध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या जुन्या मित्रांना एकत्रित आणण्याची किमया सोशल मीडियाने केली आहे. येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी मंच सन २००७-२००८ बॅचचा गुरूपूजन समारंभ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली, गेट टुगेदरच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी त्यांना पहिली ते दहावीला ज्या गुरूजणांनी ज्ञान दिले त्या सर्व गुरुंचे सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे माजी शिक्षक तुकाराम न्हावी गुरुजी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक होते.
माजी विद्यार्थ्यांपैकी गजानन क्षीरसागर यांनी सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे,माजी माध्यमिक शिक्षकांचे , कार्याचे पैलू उलगडून आठवणींना उजाळा दिला.ज्या व्यक्तीच्या जीवनात चांगले गुरू व चांगले मित्र असतात त्यांचे जीवन सफल होते हे सांगितले. जसवंत परदेशी याने मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता गीत सादर केले.
याशिवाय सत्यवान पाटील,दिपाली पवार,प्रियांका पाटील,सरला मोरे,कमलाकर धनगर,श्रीराम माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वपरिचय देत जुन्या आठवणी ताज्या केल्या.त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगतांना अनेकांना गहिवरून येत होते.
सर्व शिक्षकांनी सुध्दा जुन्या आठवणी सांगितल्या व आज पालक म्हणून माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्ये सांगितले .
त्यामध्ये डी एस पाटील सर यांनी माजी विद्यार्थ्यांकडून खरा तो एकची धर्म प्रार्थना म्हणून घेतली व संसारिक जीवनात कसे यशस्वी होता येईल याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
अध्यक्ष तुकाराम न्हावी गुरुजी यांनी माजी विद्यार्थ्यांना जीवनातील खरे सुख हे लोककल्याणात, निसर्ग संगोपनात व सामाजिक बांधिलकी जपण्यात आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक जयराम पाटील गुरुजी,जाधव गुरुजी ,गोविंद बाविस्कर गुरुजी,उपस्थित होते.जयराम पाटील गुरुजी तर या आदरातिथ्यामुळे व्यासपीठावरच भावूक झाले होते व त्यांनी उभे राहून सुंदर गीत सादर केले.माध्यमिक शिक्षकांमध्ये एम. के.बाविस्कर, एच.डी.चौधरी,
एम.एल.पाटील, डी.एस.पाटील, वाय .पी. वानखेडे, सी बी पाटील, व्हीं.टी.पाटील, एन.डी.सुशीर,सुरेश पाटील,
एस.एन.पाटील,ईश्वर भील,सुरेखा बाविस्कर मॅडम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन जसवंत परदेशी व गजानन क्षीरसागर यांनी केले. आभार समाधान बारी यांनी मानले.
आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो म्हणून शाळेच्या प्रवेशद्वाराचे रंगरंगोटीकरण करण्यात आले, सर्व मुलींना भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व भावांनी आपल्या लाडक्या बहिणींना साडी भेट म्हणून दिली. व बहिणीनी देखील आपल्या लाडक्या भाऊला चष्मा भेट म्हणून दिला.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी नृत्य करून स्नेह मेळाव्याचा अफाट आनंद घेतला तसेच संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमास्थळी सर्व वातावरण भाऊकमय झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पवन बारी,गणेश करवंदे, योगेश माळी,अमर परदेशी,अतुल पाटील,उमेश माळी,राहुल पाटील,योगेश पाटील, गजानन परदेशी,कडूबा माळी,तुषार गोरे, अमर परदेशी,ईश्वर परदेशी,प्रशांत शिंपी,विनोद माळी,चेतन पाटील,रवींद्र नरोदे,मोनाली ढोले,सरला मोरे,प्रतिभा पाटील व सर्व बॅच २००८ मित्र मैत्रिणींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दिशा लाईव्ह न्यूज.
संपादक -:- दिनेश चौधरी, लोहारा.
28 वर्षांपासून अखंडितपणे पत्रकारिता.
सत्य तेच.....फक्त दिशा लाईव्ह न्यूज मध्ये.
Post a Comment
0 Comments