Type Here to Get Search Results !

पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी घाणीचे साम्राज्य ! कित्येक वर्षांपासून नालीचा प्रश्न प्रलंबित ! ग्रामपंचायत सदस्यपती दिनकर पवार यांची ग्रामपंचायतकडे मागणी .

 


दिशा लाईव्ह न्यूज--शंकर भामेरे, पहूर , ता .  जामनेर ( ता . २ २ ) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी अर्थात पोळा दरवाजा जवळ घाणीचे साम्राज्य पसरले असून नालीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे .  गावातील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे . ही समस्या त्वरित दूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यापती  तथा सामाजिक कार्यकर्ते दिनकर भास्कर पवार यांनी केली आहे .



बाबत अधिक माहिती अशी की , पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी असलेली नाली नादुरुस्त झाल्याने नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर येत आहे . ही समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे . या ठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे . पहूर कसबे गावाकडून लेले नगरकडे जाणाऱ्या मार्गावर असणारा फरशी पूल देखील जागोजागी खड्ड्यांनी व्यापला आहे . 

प्रवेशद्वारा जवळील  अंगणवाडीची इमारत मोडकळीस आलेली आहे .  या ठिकाणचा परिसर सुशोभित करणे आवश्यक आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यापती दिनकर पवार यांनी केला आहे .  प्रवेशद्वाराच्या बाहेर असणाऱ्या अंगणवाडीत जाण्यासाठी चिमुकल्यांना कसरत करावी लागत आहे . कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्याने चिमुकल्यांना त्रास होत असून प्रवेशद्वारापासून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे . 


"सदर नालीचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल . या नालीच्या कामासाठी इंजिनियर गरुड यांना माहिती दिली आहे .लवकरच हे काम मार्गी लागेल . ' '

-------अशोक बाविस्कर , ----

ग्रामविकास अधिकारी , 

ग्रामपंचायत पहूर कसबे  , ता . जामनेर , जि . जळगाव

Post a Comment

0 Comments