दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर , ता . जामनेर ( ता . २६ ) येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या तायक्वांदो खेळाडूंनी सिन्नर येथे झालेल्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धांमध्ये धमाका उडवला असून १२ खेळाडूंच्या शिरपेच्या सुवर्ण मुकुट खोवला गेला आहे . ४ खेळाडूंनी रौप्य पदकांवर मोहर उमटविली आहे तर २ खेळाडूंनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे .
सिन्नर येथे विभागीय तायक्वांदो स्पर्धेत मुल व मुलींच्या १४ ,१७ व १९ वयोगटातील तायक्वांडो स्पर्धा जी .एम .डी .कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , सिन्नर जि . नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या . इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयातील खेळाडू हर्षदा उबाळे , जागृती चौधरी , नंदिनी सोनवणे , वैष्णवी घोंगडे वेदांत क्षिरसागर सतीष क्षिरसागर यांनी सुवर्णपदकांची कमाई केली तर यश राऊत याने कांस्य पदक पटकावले .
सावित्रीबाई फुले माधमिक विद्यालयाच्या खेळाडू मोहिनी राऊत , प्रांजली धनगर , माहेश्वरी धनगर, भावेश निकम, देवेश सोनवणे यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर वृषभ चौधरी व निलेश मालकर यांनी रौप्य पदक पटाकवले .
सरस्वती विद्यालयाची खेळाडू अंकीता उबाळे हिने सुवर्ण पदक प्राप्त केले .
गरुड हायस्कूलची खेळाडू स्वाती चौधरी हिने रौप्य पदक तर डॉ हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या मोहिनी सुन्ने हिने रौप्य पदकावर मोहर उमटविली .
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे होणार असलेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी सुवर्णपदक विजेते खेळाडू सज्ज झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . पहूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर उत्तुंग झेप घेण्यासाठी सावित्रीबाई फूले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा तायक्वांडो प्रशिक्षक हरिभाऊ राऊत , भुषण मगरे , ईश्वर क्षिरसागर यांची प्रयत्नांची पराकाष्टा करत असून गावाच्या लौकिकात भर घातली आहे .
या यशाबद्दल सर्व शाळांचे , संस्थांचे पदाधिकारी , मुख्याध्यापक , शिक्षक वृंद पालक यांनी अभिनंदन करून कौतुक केले .सुनिल पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले .
Post a Comment
0 Comments