दिशा लाईव्ह न्यूज ---पहूर , ता . जामनेर ( ता . ९) ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन रखडले असल्याने शिक्षकांना आर्थिक समस्येशी संघर्ष करावा लागत आहे .
सध्या नवरात्री उत्सव सुरु असून दसरा सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे . मात्र राज्य शासनाकडून शिक्षकांचे वेतन वेळेत होत नसल्याने शिक्षकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .
अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना तर ही समस्या अधिकच मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे .
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा .भरत शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले .त्यांनी सांगितले की , शिक्षकांच्या वेतन प्रश्नी आज बुधवारी आम्ही समता शिक्षक परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली.
सणासुदीचे दिवस असताना शिक्षकांचे वेतन रखडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात जाब विचारला व त्वरित शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे आदेश दिलेत. दोन दिवसात वेतन शिक्षकांच्या खाती जमा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले .
Post a Comment
0 Comments