Type Here to Get Search Results !

पहूर येथे उद्या ग्रामदैवत मरीमातेचा बारागाड्या उत्सव !



दिशा लाईव्ह न्यूज--शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . १०) जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे येथे ग्रामदैवत मरी माता देवीचा बारा गाड्या उत्सव उद्या शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे .

        वाघुर नदीच्या तीरावर ग्रामदैवत मरीमाता देवीचे मंदिर आहे . येथे नवरात्र निमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत आहेत .

दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे बारागाड्या उत्सव साजरा करण्यात येत होता , मात्र यावर्षी हा उत्सव तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येऊन त्याचे नियोजन नवरात्रानिमित्त उद्या करण्यात आले आहे .

परिसरातील भाविकांनी या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे . पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापासून मरी मातेच्या मंदिरापर्यंत या गाड्या ओढल्या जातात . वाघुर नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गावरील माती वाहून गेल्याने खडी उघडी पडली आहे . हाच मार्ग स्मशानभूमीकडे जाणारा असल्याने अंत्ययात्रेसाठी आलेल्या नातेवाईकांना व आप्तस्वाकियांना त्रास सहन करावा लागत आहे . संबंधितांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments