Type Here to Get Search Results !

लाडक्या बहिणींच्या रांगा थेट राष्ट्रीय महामार्गावर बँकेबाहेर मंडप टाकून योग्य नियोजन करण्याची गरज


दिशा लाईव्ह न्यूज--पहूर , ता . जामनेर ( ता . १७ ) दिवसेंदिवस लाडक्या बहिणींची बँकांमध्ये गर्दी वाढत असून पहूर येथे चक्क बहिणींनी महामार्गावरच रांगा लावल्याचे दिसून आले . बँका बाहेर ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली असून  योग्य नियोजन केल्यास ग्राहकांचा वेळ आणि कर्मचाऱ्यांचे श्रम वाचू शकतात .

सध्या राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाडक्या बहिणी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे . सणासुदीचा काळ असल्याने पैसे काढण्यासाठी साऱ्यांचीच धावपळ होत आहे . अशातच बँक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे . बँकांच्या बाहेर अक्षरशः रांगा लागत आहेत.

आयडीबीआय बँकेसमोर असलेल्या जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गापर्यंत लाडक्या बहिणींची रांग लागली होती . काही बहिणी तर महामार्गावरच उभ्या राहिलेल्या आढळून आल्या .अपघातासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी बँकेबाहेर सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांच्या माध्यमातून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे . तसेच ग्राहक सेवा कक्षांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सोयीसाठी मदत कक्ष उभारणे आवश्यक आहेत .

Post a Comment

0 Comments