सुनील लोहार, कुऱ्हाड ता.पाचोरा_ कुऱ्हाड खुर्द येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मार्फत डेंगू मलेरियाची साथ पसरू नये म्हणून अँबेटिंग सर्वे सुरू करण्यात आला आहे.
पावसाळा संपल्यानंतर दसरा दिवाळी या सणांच्या दरम्यान डेंगू आजाराची साथ पसरण्याचा जास्त धोका असतो,म्हणून गावातील रहिवासी गल्ल्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जंत , अळ्या निर्माण होतात. यामुळे डासांची उत्पत्ती वाढते, तसेच हे डास उघड्या असलेल्या पाण्यावर जास्त प्रमाणात वाढतात या करिता आरोग्य विभागातर्फे पाण्याच्या टाक्यांमध्ये जंतू , आळी नाशक औषधे टाकण्याचे काम तीन दिवसापासून सुरू करण्यात आले आहे.
जेणेकरून गावात डेंग्यू च एकही रुग्ण आढळणार नाही या करिता प्रतिबंधक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामस्थांना या आजाराविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आले . यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चे आरोग्य सेवक आर.के.राठोड, आशा स्वयसेविका निशा माळी,रत्ना बोरसे,ललिता पाटील,अंजू तेली,निता तेली ,रत्ना चौधरी यांनी गावात घरोघरी जाऊन डेंग्यू प्रतिबंधक साठी उपाययोजना केल्या.
Post a Comment
0 Comments