Type Here to Get Search Results !

लोहारा येथील डॉ. जे.जी.पंडित विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक यावर व्याख्यान--अनेक मान्यवरांची उपस्थिती!!


दिशा लाईव्ह न्यूज --::--- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित  लोहारा येथील डॉ. जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दि. 8/10/2024 रोजी स्वर्गीय अण्णासाहेब आनंदराव रघुनाथराव शेळके पाटील यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक या विषयावर युवा शिवरत्न जयवर्धन नेवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंदुर्णी संस्थेचे सहसचिवआदरणीय श्री  यु. यु. पाटील सर होते.  विद्यालयातील विद्यार्थिनी मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताने केले.स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते युवा शिवरत्न जयवर्धन नेवे हे  निलेश नेवे भास्कर नेवे उपस्थित होते .


सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख वक्ते व मान्यवर उपस्थित मंडळी यांच्या हस्ते सरस्वती माता , आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उपस्थित मान्यवर मंडळी यांचा आयोजकांमार्फत शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील यांनी केले. या  व्याख्यानमालेचा उद्देश उपस्थिताना करून दिला. यानंतर युवा शिवरत्न जयवर्धन नेवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती करून दिली.


यावेळी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग वर्णन त्यांनी सांगितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा असावा याविषयी विचार मांडले.


या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष व आदर्श मा.मुख्यध्यापक अ अ पटेल सर ,माजी मुख्याध्यापक व गोड व्यक्तिमत्त्व श्री.आर एस परदेशी सर ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार, स्थानिक सल्लागार समितीची सदस्य उत्तमराव शेळके ,शिवराम भडके साहेब ,सुरेश चौधरी  ,मा.निवृत्त पर्यवेक्षक श्री पी व्ही जोशी सर ,  जेष्ठ नागरिक संघाचे श्री लक्ष्मण रामचंद्र माळी,तसेच गावातील अनेक मान्यवर मंडळी  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. यु डी शेळके मॅडम, पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले. तर आभार वाय पी वानखेडे सर यांनी मानले.

 या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



जळगांव जिल्ह्यातील सर्वोत्तम न्यूज चॅनेल,सर्वोत्कृष्ट बातम्या, जलद नेटवर्क--आणि....जवळपास 19 लाख वाचक!!

फक्त--दिशा लाईव्ह न्यूज. अल्पावधीतच यशोशिखरावर!!

संपर्क-:- 9881028027

9309918930

Post a Comment

0 Comments