दिशा लाईव्ह न्यूज,शंकर भामेरे,-पहूर , ता . जामनेर ( ता . १५) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील वाघुर नदीवर उभारण्यात आलेल्या फरशी पुलास पोळ्याच्या दिवशी आलेल्या महापुराने भगदाड पडले . हे भगदाड बुजण्यासाठी ग्रामपंचायतीला काँक्रिटीकरण करण्याची मागणी करण्यात आली मात्र केवळ मलमपट्टी करून ग्रामपंचायतीने दोन वेळा मुरूम टाकला . मात्र वाघुर नदीला येत असलेल्या पुरांमुळे सदर मुरूम वाहून जात आहे . दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरात पुन्हा मुरूम वाहून गेला असून भगदाड 'जैसे थे ' झाले आहे .त्यामुळे ग्रामपंचायतीचे नुकसान होत आहे .
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या पुलावरील भगदाडाचे कॉंक्रिटीकरण करून कायमस्वरूपी समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली आहे.
रेशन दुकानावर लेले नगर , महात्मा फुले नगर , शिवनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने याच मार्गावरून जात असतात .तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा , मिल्लत उर्दू हायस्कूल कडे जाणारे विद्यार्थी देखील पहूर कसबेतून जाताना याच मार्गाचा वापर करतात . परंतु पुन्हा पुन्हा सदर भगदाड जैसे थे होत असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . पूर ओसरून दोन दिवस उलटले असले तरी अजून भगदाड जैसे थे असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे . सदर भगदाड कॉंक्रिटीकरण करून कायमस्वरूपी बुजवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा सर्वसामान्य जनतेने दिला आहे .
https://youtu.be/Z1heUCTxqn4?si=Iy9ioo0n3zB6Sxbq
या पूला संदर्भात संतप्त ग्रामस्थ काय म्हणतात..बघू या.
वरील लिंकला क्लीक करा-आणि व्हिडीओ बघा.
Post a Comment
0 Comments