दिशा लाईव्ह न्यूज,-बाळू जोशी,वाकडी.ता.जामनेर.दि.१३/१०/०२४ वाकडी,ता.जामनेर येथील बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे.
गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे.
नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, मात्र काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचकआणि वचक तर मुळीच नाही,
बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,
अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी वाकडी येथील गावकरी करीत आहेत.
Post a Comment
0 Comments