Type Here to Get Search Results !

पहूरला ५०% लाभार्थी रेशन मालापासून वंचित धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी : लाभार्थ्यांची मागणी




दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता .१०) जामनेर तालुक्यातील पहूर - कसबे येथे सप्टेंबर महिन्यातील रेशन मालापासून ५०% लाभार्थी वंचित असल्याने ऐन  सणासुदीच्या काळात मनस्ताप सहन करावा लागत आहे . धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे .

      जामनेर तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा अधिकाऱ्यांकडून पहूर कसबे येथे २८ सप्टेंबर रोजी धान्य उपलब्ध झाले .

 स्थानिक रेशन माल दुकानदारांनी दोन दिवस धान्य वितरण केले . मात्र १ ऑक्टोबर पासून पॉस मशीनवर सप्टेंबर महिन्याचे धान्य वितरण बंद झाल्याने सुमारे ५० टक्के लाभार्थी वंचित आहेत . शंभर टक्के लाभार्थ्यांचे धान्य उपलब्ध झालेले असले तरी  मुदत संपल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याने सप्टेंबर महिन्याच्या धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी ,  अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

                आनंदाचा शिधा मात्र अपुराच

राज्य शासनातर्फे गणेश चतुर्थी ,  दसरा आणि दिवाळी या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा रेशन दुकानांद्वारे वाटप केला जात आहे . 

मात्र हा शिधा ९३% लाभार्थ्यांनाच दिला जाणार असल्याने उर्वरित ७ टक्के लाभार्थ्यांचे काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे . प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने शिधा वाटप होत असल्याने उर्वरित लाभार्थी वंचित राहणार   आहेत . त्यामुळे आनंदाचा शिधा १००% लाभार्थ्यांना देण्यात यावा ,  अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे .


दिशा लाईव्ह न्यूज---

दर्जेदार, सुवाच्य ,आणि निर्भीड बातम्यांसाठी..

आपले सर्वांचे आवडते न्यूज चॅनेल.

9881028028



Post a Comment

0 Comments