शंकर भामेरे, पहूर , ता जामनेर ( ता. २४ )
पंजाबमधील अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या ३ खेळाडूंची निवड झाली आहे .
पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या ५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता .त्यातून शेंदूर्णी येथील बेग सहिल व चौधरी लोचना तसेच पहूर येथील गौरी कुमावत या ३ खेळाडूंची निवड झाली .
शेंदुर्णी येथील आ. र .भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गौरी विजय कुमावत, लोचणा श्रीकृष्ण चौधरी ,साहील बेग यांनी सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली तर दिनेश वासुदेव राऊत याचा उत्कृष्ट सहभाग राहीला .जामनेर येथिल सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेणारा खेळाडू भूषण मगरे याने रौप्य पदक प्राप्त केले .या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत , श्री छत्रपती शिवाजी तायक्वांदो क्लासचे प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी प्रा . डॉ.महेश पाटील, प्रा .पियूष महाजन याचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल दि शेंदुर्णी सेकंडरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड , प्राचार्य डॉ .एस .डब्ल्यू . भोळे ,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धारीवाल ,प्राचार्य डॉ.शशिकांत बऱ्हाटे , जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे , स्पोर्ट अकॅडमीचे उपाध्यक्ष बाबुराव घोंगडे , ॲड . संजय पाटील यांच्यासह सर्व संचालकांनी अभिनंदन केले .
Post a Comment
0 Comments