दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . ८ ) जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा परिसर गवत आणि झुडपांनी व्यापला आहे . शवविच्छेदन कक्षाकडे जाता - येता चिखलातून मार्ग काढावा लागत आहे .ग्रामीण रुग्णालय परिसरात झुडपांचे साम्राज्य पसरल्याने परिसरात रहिवास करून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे .
वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबंधितांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
सदर समस्येकडे दिशा लाईव्ह न्यूजच नक्कीच लक्ष असणार आहे.
बघूया संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय?
Post a Comment
0 Comments