सुनील लोहार, कुऱ्हाड --प्रतिनिधी
दिशा लाईव्ह न्यूज -:- असे मानले जाते की या धकाधकीच्या , व धावपळीच्या युगात जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही गंभीर आजाराच्या व्याधी निर्माण होतात, तेव्हा एखादा डॉक्टर आपल्या हुशारी व कौशल्याने त्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार किंवा शस्त्रक्रिया करून जीवनदान देतात.
तेव्हा लोक सबंधित डॉक्टरला माणसातील देव मानतात. म्हणजेच डॉक्टरांमध्ये परमेश्वराचे रूप असतेच असा अर्थ काढतात.
असाच प्रत्यय पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील मुत्खड्याचा रुग्ण अर्जुन अहिरे वय 35 या तरुणावर आला.
सहकृपा हॉस्पिटल पाचोरा येथे डॉ.कुणाल पाटील यांनी तब्बल 7 सेंटिमीटर चा मुतखडा काढून या रुग्णास जीवनदान दिले.
वाघुलखेडा येथील रुग्ण अर्जुन अहिरे हे गेल्या एक ते दीड वर्षापासून मुतखड्याच्या त्रासापासून त्रस्त होते. अनेक दिवस उपचार करून देखील त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. या रुग्णाने पाचोरा येथील सहकृपा हॉस्पिटल येथे उपचार केले.
आता डॉक्टरांनी त्याला मुतखडा असल्याचे सांगितले. डॉक्टर कुणाल पाटील यांनी सदर रुग्णास ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला ,रुग्णास दाखल करून काल त्याच्यावर यशस्वीपणे एक ते दीड तास शस्त्रक्रिया करून तब्बल 7 सेंटिमीटर चा म्हणजेच बटाट्याच्या आकाराएवढा खडा काढण्यास डॉक्टरांना यश आले.
आता या रुग्णाची प्रकृती चांगली असून,आमच्या हॉस्पिटल मधील ही मोठ्या आकाराच्या खड्याची व जोखमीची शस्त्रक्रिया मोठ्या खड्याची व जोखमीची शस्त्रक्रिया असल्याचे डॉ.कुणाल पाटील यांनी दिशा न्यूज शी बोलताना सांगितले.
रुग्णाला या असह्य त्रासातून बाहेर काढल्याबद्दल रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले .
Post a Comment
0 Comments