दिशा लाईव्ह न्यूज ,पहूर , ता . जामनेर ( ता . २९)
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहूर येथे बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली असली तरी बळीराजावर मात्र ओल्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे .'दिवाळी सण मोठा । नाही आनंदाला तोटा ' असे दिवाळीचे महत्त्व आहे .वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचा आनंद काही वेगळाच असतो . 'तमसो मा ज्योतिर्गमय ' अर्थातच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचे साऱ्यांनाच अप्रूप असते .
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत केरसुनी , पणत्या , लक्ष्मी देवीच्या मूर्ती , आकाश कंदील , पूजेच्या तसेच सजावटीच्या साहित्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे . असे असले तरी परतीच्या पावसाने शेत शिवारात झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे .
Post a Comment
0 Comments