दिशा लाईव्ह न्यूज -:- सध्या जामनेर विधान सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्यातच राष्ट्रवादीने खोडपे सरांना तिकीट देऊन मतदारांमध्ये उत्साह वाढवला आहे. गेल्या महिन्यापासून तालुक्यात सरांना खेड्यापाड्यात खूपच सहानुभूती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
असाच किस्सा दिनांक 25/10 2024 रोजी वार शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता दिलीप खोडपे सरांची करमाड या गावामध्ये प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती .गावातील लोकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद ,प्रेम,सहानुभूती,गावकऱ्यांचे प्रेम यावेळी या लोकांचा बघण्यास मिळाले.
तसेच माता भगिनींनी सरांचे औक्षण करून स्वागत केले व काही भगिनींनी भावा कडून दिवाळी निमित्त ओवाळणी घेण्या ऐवजी त्यांनी गरीब भावाला विधान सभेसाठी खर्च करण्यासाठी मदत म्हणून चेक स्वरूपात 2100 रुपयाची रक्कम प्रदान केली.
अश्या या विर मातेस विनम्र अभिवादन. शकुंतलाबाई सुरेश पाटील असं या माईचे नाव आहे .
Post a Comment
0 Comments