दिशा लाईव्ह न्यूज ,लोहारा ता.पाचोरा दि.६ राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री
(गृहनिधी व न्याय यांचे कार्यालय) व गिरीश भाऊ महाजन फाउंडेशन तसेच न्यू रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा लोहारा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर दि.५ शनिवार रोजी घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जामनेर नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, यांनी केले. या वेळी जामनेर तालुक्यातील जेष्ठ नेते संजय दादा गरुड, जे.के.चव्हाण, अरविंद देशमुख, तुकाराम निकम , मधुकर काटे, छगन झाल्टे, गोविंद आग्रवाल, राहुल राजपूत, शरद पांढरे, विलास राजपूत, पितांबर भावसार,राहुल पाटील ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये एकूण ७६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३६३ रुग्णांना मोफत चष्म्या देण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ रुग्णांची बी.पी. व शुगर ची तपासणी करण्यात येऊन मोफत औषध उपचार देण्यात आले. ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे अशा रुग्णांना तात्काळ जामनेर येथे रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . व २०७ रुग्ण मोफत मोतीबिंदू ऑपरेशन साठी जामनेर येथे पाठवण्यात येणार आहे. तर १९५ रुग्णांची डोळ्यातील साय काढण्यात येणार आहे.
या शिबिरातील तपासण्या/औषध वाटप / रुग्ण स्थलांतर व निदान
जी. एम. फाउंडेशन व न्यू रुबी स्टार हॉस्पिटल सि.ई.ओ.डॉ.धनराज चौधरी, डॉ.राजेश्वरी ठाकूर , डॉ. संदीप पाटील, डॉ.उत्कर्षां सोनवणे,डॉ.शिवानी पाटील, पंकज पाटील (कॅम्पिंनिंग मॅनेजर ),
वासुदेव बारी(फार्मसिस) व नर्सिंग स्टाफ
आदित्य भोई रुग्णवाहिका चालक यांनी केले.
शिबिर यशस्वीतेसाठी भाजपा जेष्ठ नेते शरद सोनार, कैलास चौधरी, चंद्रकांत पाटील,शिवराम भडके, लोहारा नगरीचे सरपंच अक्षय जयस्वाल,दिपक खरे, सुनिल क्षिरसागर, किसन पाटील, प्रवीण पाटील, अमृत चौधरी, प्रभाकर चौधरी, सुरेश चौधरी, संभाजी चौधरी, सुरेश पाटील , अतुल कोळी शेणफडू कोळी,प्रवीण चौधरी,राहुल कटारिया, हितेश पालीवाल, आण्णा चौधरी , मुकेश पालीवाल, संजय पाटील, संजय उशिर, बापू सावकार, विशाल पवार,आशा सेविका , अंगणवाडी सेविका. आदींनी परिश्रम घेतले.
द युवा ग्रामीण पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य.
आपल्या जळगांव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय अधिकृत पत्रकार सभासद नोंदणी चालू झाली आहे.
ज्या पत्रकार बांधवांना सदर संघटनेत सभासद व्हायचे असेल/ काम करायचे असेल, त्यांनी त्वरित जळगांव जिल्हा अध्यक्ष-दिनेश चौधरी, लोहारा यांचेशी त्वरित संपर्क साधा.
9309918930
9881028027
Post a Comment
0 Comments