Type Here to Get Search Results !

लेलेनगर जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम रखडले ! उघड्या आसाऱ्यांमुळे चिमुकल्यांच्या जिवीतास धोका ' बाला ' उपक्रमाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ ! ग्रामपंचायतीने त्वरित सदर काम पूर्ण करून देण्याची मागणी !



दिशा लाईव्ह न्यूज--शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १८ ) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावात लेले नगर मधील जिल्हा परिषद विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वाराचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले असल्याने प्रवेशद्वार उभारणीसाठी काढलेल्या उघड्या असणाऱ्या मात्र चिमुकल्यांच्या जीवाशीच खेळ खेळत आहेत .याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे . सदर काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी पालकांनी केली आहे .



याबाबत अधिक माहिती अशी की , पहूर कसबे गावातील लेले नगरात असलेल्या जिल्हा परिषद विद्या मंदिर शाळेची 'बाला ' अर्थातच Building as Learning AIDS ( BaLA ) उपक्रमात निवड झाली . या उपक्रमांतर्गत मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर कामे पूर्ण झालेली आहेत , मात्र महत्त्वाचे असलेले प्रवेशद्वाराचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे . खरंतर या उपक्रमाचा मुख्य उद्देशच असा आहे की , 'शाळा इमारत हीच एक शैक्षणिक साहित्य बनविणे ' . यात प्रवेशद्वाराची महत्त्वाची भूमिका आहे . मात्र या महत्त्वाकांक्षी उपक्रमालाच ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे हरताळ फासला जात आहे . ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधित ठेकेदार आजारी असल्याचे कारण सांगितले .


मात्र पर्यायी व्यवस्था करून सदर काम पूर्णत्वास न्यावे व शासनाच्या 'बाला ' उपक्रमाचा मुख्य उद्देश साध्य होण्याच्या ध्येयाने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करावे  , अशी मागणी विद्यार्थी - पालक वर्गातून होत आहे .

प्रवेशद्वारासाठी काढलेल्या लोखंडी आसाऱ्या उघड्याच असल्याने चिमुकले विद्यार्थी शाळेत येता - जाता आपला जीव धोक्यात घालत आहेत .


शाळेला जुना लोखंडी दरवाजा असला तरी दरवाज्याच्या बाजूलाच तुटलेल्या भिंतीच्या आश्रयाने शाळा सुटल्यानंतर उपद्रवी लोक शाळेत घुसतात .त्यामुळे शाळेचे नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे सदर काम ग्रामपंचायतीने प्राधान्याने लक्ष घालून पूर्ण करावे , अशी मागणी होत आहे .


"जिल्हा परिषद लेलेनगर शाळेचा हा प्रश्न सोडवला गेला तर दिवाळीच्या सुट्यांमध्ये शाळेच्या भौतिक सुविधांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. "

       महेश मोरे , 

         उपशिक्षक ,

          जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर लेलेनगर , पहूर - कसबे .




Post a Comment

0 Comments