दिशा लाईव्ह न्यूज
दिशा लाईव्ह न्यूज-पहूर , ता . जामनेर ( ता . २३ ) संपूर्ण राज्यभरात १५ ऑक्टोबर २०२४ पासून २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केली आहे . या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे , असे आवाहन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या सूचनापत्राद्वारे केले आहे .
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो . लोकशाही बळकट करण्याचे कार्य निवडणुकांच्या माध्यमातून होत असते . निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे आदर्श आचारसहितेची अंमलबजावणी केली जाते .
या पार्श्वभूमीवर पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १६८ प्रमाणे लेखी सूचनापत्र जारी केले आहे . त्यात म्हटले आहे की "सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्यास संबंधितांसह ग्रुप ॲडमिनवर कारवाई होणार आहे . तसेच धार्मिक भावना दुखविणारे मजकूर पाठविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे . राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचविणाऱ्या पोस्ट कोणीही व्हायरल करू नयेत , अन्यथा कठोर कारवाई करण्यात ," असे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सूचनापत्रात म्हटले आहे .
Post a Comment
0 Comments