Type Here to Get Search Results !

पहूर येथील ५४ भाविकांची आयोध्या दर्शन यात्रा संपन्न :मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेचा घेतला लाभ :जिल्ह्यातून एकूण ८०० यात्रेकरूंचा सहभाग

               


                      

 दिशा लाईव्ह न्यूज -(शंकर भामेरे,पहूर ता.जामनेर  )    ---दि.४- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजने   अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८०० यात्रेकरूंची लाॕटरी पध्दतीने निवड झाली होती.या योजनेसाठी जिल्ह्यातुन ११७७ अर्ज प्राप्त झाले होते.त्यात पहूर येथील ५४ भाविकांची निवड झाली .तर जामनेर तालुक्यातील एकुण १०५ भाविक आयोध्या दर्शन यात्रेत सहभागी झाले होते.  


विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे ८०० भाविकांना घेऊन ३० सप्टेंबर रोजी आयोध्येकडे रवाना झाली होती. राज्यातील जे नागरिक ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत.त्यांची भारतातील तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी प्रभू रामलल्लांची यांची जन्मभूमी असलेल्या श्रीराम मंदीर आयोध्या हे स्थान निश्चित करण्यात आले होते.आयोध्या येथे जाण्यासाठी आय.आर.सी.टी.सी.यांच्यासोबत झालेल्या करारानुसार वातानुकुलीत 'भारत गौरव पर्यटन' ही विशेष रेल्वे करण्यात आली होती.

रेल्वे प्रवासात यात्रेकरूंची व्यवस्था करण्यासाठी आय.आर. सी.टी.सी.च्या कर्मचाऱ्यांकडून चहा,दुध,बिस्कीट,आॕक्वाचे पाणी,नाष्टा ,जेवणासह आयोध्येत राहण्यासाठी लाॕजची व्यवस्था करण्यात आली होती.जेष्ठ वयोवृध्दांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सोबत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याणचे अधिकारी तसेच वैद्यकीय पथक यांनी विशेष काळजी घेतली. 

भाविकांनी आयोध्येतील भव्य श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीचे दर्शन घेतले.यासह हनुमान गढी, दशरथ महल,कनक महल,लता मंगेशकर चौक या स्थळांना भेटी देऊन सायंकाळी शरयू नदीत स्नान करून शरयू मातेच्या महाआरतीत सहभाग नोंदविला.


एक दिवसाच्या मुक्कामा नंतर दि.२रोजी रात्री११ वा. 'भारत गौरव पर्यटन रेल्वे'  जळगावकडे परतीच्या प्रवासाला लागून दि.४ रोजी सकाळी ६ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली.

आयोध्या दर्शनाचा लाभ मिळाल्याने यात्रेकरूंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजीत पवार सह ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानीत समाधान व्यक्त केले.व आयोध्या दर्शन यात्रा आविस्मरणीय झाल्याची भावना व्यक्त केली.

आयोध्या दर्शन घेऊन आलेल्या सर्व  भाविकांना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभाग व भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारा  रामलल्लाच्या आयोध्या मंदीराच्या प्रतिमा तसेच जी एम फाऊंडेशन जळगाव यांच्या कडून प्रभू श्रीरामाचा फोटो असलेल्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.यात्रेकरूंचा प्रवास सुखरूप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.



दिशा लाईव्ह न्यूज.

वाचकांचा विश्वास!!--एक वर्षात जवळपास 18 लाख व्हिजिटर.


Post a Comment

0 Comments