Type Here to Get Search Results !

पहूरला अवैध धंद्यांविरुद्ध तरुणांचा एल्गार ! अनेकांचे संसार उध्वस्त : पोलिसांना निवेदन



 पहूर ,ता.जामनेर ( ता . १ ६) पहूर व परिसरात जुगार, सट्टा , खुलेआम मद्य विक्री तसेच अवैध धंदे बोकाळले असून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी तरुणांनी कमर कसली असून  आज  बुधवारी ( ता . १ ६ ) पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले.



 पहूर परिसरातील बेकायदेशीर अवैध धंद्यामुळे  कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न गंभीर झालेला असून  वर्दळीच्या जागी हे धंदे राजरोस सुरू असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्याची दखल घेऊन सदर अवैधरित्या चालणारे सर्व धंदे बंद करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन पहूर पोलीस ठाण्यात देण्यात आले . या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य महेश अशोक पाटील,  विशाल सुभाष पाटील, शिवराज भास्कर देशमुख, राहुल चंद्रकांत पांढरे ,सचिन राजेंद्र पाटील, उमेश विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत .

Post a Comment

0 Comments