दिशा लाईव्ह न्यूज :-: बाळू जोशी वाकडी.ता.जामनेर.दि.०६/१०/२४ जामनेर तालुक्यातील वाकडी येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो,
यावेळी विविध मंडळांनी आदिशक्तीच्या असलेल्या विविध रुपात भव्य दिव्य मूर्ती असलेल्या आरसाची हिंदू धर्माच्या परंपरे नुसार विविधवत पुजन करून घटस्थापना केली, येथील असलेल्य विविध मंडळांनी आपल्या कलाकृतीतून देखावे तयार केले असून येथील दुर्गा उत्सवाला पंचक्रोशीतील आणि जिल्हाभरातील अनेक भाविक हजारो संख्येने देवी दर्शन व देखावे बघण्यासाठी हजेरी लावून भक्तीरसाचा आनंद घेत देवीचा जयघोष करीत असतात,
तसेच भाविकांच्या सेवेसाठी ग्रामस्थ कार्यरत असतात, सर्व दुर्गा मंडळ एकमेकांना सहकार्य करतात, बाहेर गावाहून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या आदिशक्तीच्या भाविकांसाठी शुध्द पिण्याचे पाणी व्यवस्था येथील धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेले साई गृपचे अध्यक्ष व सदस्य करतात.
Post a Comment
0 Comments