दिशा लाईव्ह न्यूज। -:-पहूर , ता . जामनेर ( ता . ५ ) कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना लोंढरी बुद्रूक ( ता . जामनेर ) येथे घडली .
जीवन ज्ञानेश्वर भागवत ( वय - ३८ )असे मयत शेतकऱ्याचे नाव असून गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते . आर्थिक संकटावर मात व्हावी , यासाठी त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला . मात्र यातही त्यांना यश न आल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली .
पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . वैद्यकीय अधिकारी डॉ . संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत .
त्यांच्या मृत्यूने पाचवीतील अनिकेत आणि सहावीतील तेजस्विनी या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले . त्यांच्या पश्च्यात वृद्ध आई , पत्नी , लहान भाऊ , वहिनी असा परिवार आहे .घरातील कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्याने लोंढरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .
Post a Comment
0 Comments