दुः ख शेतकऱ्याचं . .🌱
शेतकऱ्याचं दुःख हाये
मनाले चटका लावणारं ,
काया माटीत गाडूनही
नवा विचार पेरणारं॥ १ ॥
आवकाळीनं हिसकला
हाताले येल घास ,
शेतकऱ्याच्या मानीभवती
घट्ट झाला फास ॥ २ ॥
दिवायीले मक्का ईकून
कर्ज फेडीन म्हणे ,
सासरवाशीन लेकिले
घेणार व्हता सोने ॥३ ॥
पण काय सांगू तुम्हाले
शेतकऱ्याची कथा ,
डोळ्यात येतं पाणी
आयीकताना व्यथा ॥ ४ ॥
शेतकऱ्याच्या जीवावरच
आपण खातोय अन्न ,
कणसांवरचे कोंब पाहून
मन होतंय सून्न ॥ ५ ॥
✍️शंकर रंगनाथ भामेरे , उपशिक्षक
सावित्रीबाई फुले माध्य . विद्यालय , पहूर
Post a Comment
0 Comments