दिशा लाईव्ह न्यूज-पहुर - जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्याची बदली करून पहुर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा ठराव पहुर कसबे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहुर कसबे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पहुर कसबे ग्रामस्थांनी अर्ज दिला तो अर्ज सविस्तर वाचून दाखविला .पहुर गावी चोरीचे प्रमाण वाढत असून गावी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून आपले गावातील ग्रामस्थ चोऱ्यांना व अवैध धंद्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले असून पहुर गावी चोऱ्यांच्या घटना थांबत नाही आहे व गावठी दारू अड्डे व सट्टा दुकाने खुलेआम सुरू आहे ते बंद होत नसल्याने पहुर पोलीस स्टेशनच्या मुख्य पोलीस अधिकाऱ्याची बदली करून पहुर पोलीस स्टेशनला नवीन पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असा ठराव पहुर कसबे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ठरावाला सुचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे तर अनुमोदक - तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे आहे.
यावेळी माजी सरपंच शंकर जाधव, ग्रामविकास अधिकारी अशोक बावस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे , माजी सरपंच लक्ष्मण गोरे , उपसरपंच राजू जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , पुंडलिक भडांगे, शिवाजी राऊत , गोविंदा घोंगडे , दिनकर पवार , पुंडलिक लहासे , बाळू सुरळकर ,सुभाष धनगर , मधुकर बनकर, ईश्वर हिवाळे, सुनिल बनकर , पुंडलिक भडांगे , सुनिल लहासे, शंकर भामेरे सर,शिवाजी राऊत, किरण जाधव, सरफोद्दीन शेख , ईश्वर बनकर यांच्या सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पहुर कसबे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत झालेल्या ठरावावर अंमलबजावणी व्हावी व निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद साहेब यांची पहुर येथील शेतकरी व ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे, पुंडलिक भडांगे, अशोक बनकर, देवेंद्र घोंगडे, बाबुराव भडांगे, अर्जुन पवार, किरण जाधव यांनी भेट घेतली व निवेदन दिले. तसेच जिल्हापोलीस अधिक्षक साहेब यांनाही निवेदन देण्यात आले तसेच पहुर कसबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या ठरावावर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Post a Comment
0 Comments