Type Here to Get Search Results !

महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्रीय समितीचे वरिष्ठांना निवेदन!!


दिशा लाईव्ह न्यूज---प्रतिनिधी - कृष्णा पाटील फत्तेपूर -तोरणाळे 

जामनेर - तालुक्यातील देऊळगाव गुजरी व तोरणाळा येथून पूर्व पश्चिम राष्ट्रीय महामार्ग वाहतो महामार्ग बनला जनतेच्या सुविधांसाठी परंतु जेव्हापासून महामार्ग बनला तेव्हापासून अनेकदा महामार्गावर छोटे-मोठे अपघात घडले आहेत या अपघातामध्ये लहान व तरुणांची जीवित हानी झालेली आहे 


कारण देऊळगाव गुजरी व तोरणाळा येथून वाहत असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने गाव वस्ती व शाळा असून महामार्गावर कुठेही गतिरोधक नाहीत .त्यामुळे नेहमीचं अपघात घडतात यापुढे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना व योग्य त्या ठिकाणी गतिरोधक बनवून द्यावेत ,म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मिर्झा जावेद बेग साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जटाळे व तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

 आमच्या गावामध्ये या अगोदर अनेक वेळा छोट्या मोठ्या वाहनांच्या अपघातामध्ये जीवित हानी घडलेली असून एकाच घरातील दोन दोन व्यक्ती अपघातात गमावलेले आहेत त्यामुळे होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी आमच्या गावाला योग्य त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बनवून द्यावेत अन्यथा यापुढे होणारे अपघात केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळेच होतील असेही त्यांच्या निवेदनातून म्हटले आहे.

 तसेच यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments