मशागत करून मिळेल तेथुन कर्ज काढून पेरणीपूर्वी महागाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके घेऊन ला- गवड केली. त्या पिकांची उन्हा तानात अंतर्गत मशागत करून पिकांचे लेकरा सारखे संगोपन केले. कपाशी वेचणीला आली, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी कापनीला आली आशा ऐनवेळी सतत सात ते आठ दिवस परतीच्या जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे कापलेला मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन सारख्या पिकांच्या कणसांना कोंब आली आहे.
कपाशीच्या बोनडांनाही कॉब आले असल्याने आपल्या डोळ्यासमोर हाता तोंडाशी आलेल्या मालाचे नुकसान बघून शेतकरी खिन्न अवस्थेत दिसत असून महागड्या बियाणांचे, रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचें देने कसे फेडावे यासह वर्षभर घरखर्च कसा करावा अशा चिंतेत शेतकरी असून शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लोहारा व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments