Type Here to Get Search Results !

मेंढपाळ बांधवांचे कबिले नाशिक जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात दाखल ! पालावरच साजरी होणार दिवाळी ! पालावरचे जीणं मेंढरचं आमचं सोनं !



दिशा लाईव्ह न्यूज ,शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . २५) 

साऱ्यांनाच दिपोत्सवाचे वेध लागलेले असताना मेंढपाळ बांधव मात्र जित्राबासाठी मजल दरमजल करत नाशिक जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहेत . नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील काही मेंढपाळ बांधवांनी आज शुक्रवारी ( ता . २ ४ ) पहूर मार्गे देवपिंपरी कडे प्रस्थान केले .यावेळी मेंढपाळ कुटुंबातील महिलांनी सांगितलं की , आमची दिवाळी वाड्यावरच साजरी होईल .पालावरचं आमचं जिणं ! मेंढरं हेच आमचे सोनं ! असं सांगून त्यापुढे मार्गस्थ झाल्या .



घोड्यांच्या पाठीवर लादलेलं जीवनावश्यक सामान , चिमुकल्यांना ऊन लागू नये म्हणून बैलगाडीवरच केलेली सावली , लहान लेकरांसोबतच मेंढरांची नुकतीच जन्मलेली पिलं काही कोंबड्या आणि त्यांच्या दिमतीला असणाऱ्या मेंढपाळ भगीनी ,  असा सारा लवाजमा घेऊन वर्षानुवर्षे मेंढपाळ बांधव भटकंती करतात ते आपल्या जित्राबाकरीता . . . उन -वारा - पावसाची तमा न बाळगता येईल तशा परिस्थितीशी संघर्ष करत मेंढपाळ बांधव जीवन जगत असताना सण -वारही  वाड्यावरच साजरे करून जगण्याची प्रेरणा देतात . 


निसर्गाच्या कुशीत वास्तव्य करून निसर्गाची जोपासना करणाऱ्या  मेंढपाळ बांधवांना मात्र भटकंतीमुळे आरोग्य व शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपासून बऱ्याचदा वंचित रहावे लागते , हेही तितकेच खरे .



Post a Comment

0 Comments