दिशा लाईव्ह न्यूज-पहूर , ता . जामनेर ( ता . १० )
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये लाडक्या बहिणीसह ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली असून अक्षरशः बँकांच्या बाहेर रांगा लागल्या .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना , पीएम किसान योजना या योजनांचे हप्ते बँकांमध्ये जमा झाले असल्याने शेतकरी तसेच ग्राहक पैसे काढण्यासाठी मोठ्या संख्येने बँकांमध्ये आल्याने आज शुक्रवारी ( ता . ११ ) अक्षरशः बँकांच्या बाहेर रांगा लागल्या .
खाते केवायसी करणे , पैसे काढणे यासाठी लाडक्या बहिणींना तासन् तास उन्हातान्हात ताटकळत राहावे लागत आहे . तसेच नियमित ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे . सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी बँकांसमोर मंडप तसेच पिण्याचे पाण्याची सोय तसेच सहायता कक्ष स्थापन करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे .
Post a Comment
0 Comments