दिशा लाईव्ह न्यूज --::--- शेंदुर्णी ता. जामनेर दिनांक 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत शेंदुर्णी परिसरात अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शेंदूर्णी ,मेणगाव, बिलवाडी, मोराड,गोंदेगाव, लिहातांडा, जंगीपुरा, चिलगाव या सह परिसरात अस्मानी संकटाने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे .शासनाने शेतकऱ्याचा विचार करुन सरसकट पंचनामे करण्याची शिवसेनेने मागणी केली आहे.
या बाबत शिवसेना शहर शाखेच्या वतीने तहसीलदार जामनेर यांना तलाठी सज्ज शेंदूरणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे शेंदुर्णी परिसरातील खरीप व फळबाग यांचे नुकसान झालेले असून कोणतेही निस्कट न लावता सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत चा अहवाल शासनाला पाठवावा अशी विनंती निवेदनद्वारे करण्यात आली सदरचे निवेदन योगेश ब्राह्मने ,तलाठी शेंदुर्णी यांनी स्वीकारले
शिवसेना शेंदुर्णी शहर शाखेचे वतीने शहर प्रमुख भैया भाऊ गुजर युवराज भाऊ बारी अशोक भाऊ बारी कैलास शेठ काबरा सुनील अग्रवाल सुदाम माळी विजू गुर्जर प्रवीण सूर्यवंशी. तुकाराम पाटील संदीप बारी निलेश गुजर सुनील बेराड सुनील पुसे संतोष माळी बंटी बारी व अनेक शेतकरी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments