दिशा लाईव्ह न्यूज --::--- जामनेर तालुक्यातील पाळधी हे गाव जळगाव छत्रपती संभाजी नगर या महामार्गावर असून या गावात शिक्षणासाठी पाळधी गावासह परीसारतील सोनाला, भराडी, नाचणखेडा, भिलखेडा, सार्व, जोगलखेडा, लाखोली या गावातील विद्यार्थी हे श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.तसेच बाहेर गावांना जाण्यासाठी देखील वरील गावातील ग्रामस्थ हे पाळधी गावात येत असतात.
तसेच पाळधी गावात जिल्हा परिषद मुलांची शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळा यामुख्य महामार्गाला लागून असल्याने गावातील तसेच साईनगर, शिवाजी नगर वाडी भाग येथील देखील लहान मुले हे शिकण्यासाठी येत असतात.
गावातील ग्रामस्थ व शाळेत येणार विद्यार्थी यांना मुख्य बस स्थानक चौफुली व महाराणा प्रतापसिंह चौफुली याठिकाणी रस्ता ओलांडून जावे लागते. तसेच या महामार्गावर वाहनाची वर्दळ असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने येणारी व जाणारी वाहने हि जोरात असल्याने या दोन्ही ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले असून जीवित हानी देखील झाली आहे.
तरी आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सदरील महामार्ग कार्यालयात योग्य तो अहवाल सदर करून पाळधी गावतील दोन्ही ठिकाणी वाहनाचा वेग कमी करण्यासाठी यंत्रणा बसविण्याचे सांगावे. जर कोणतीही उपाय योजना न केल्यास भविष्यात जर काही अपघात झाला तर त्यास संपूर्ण पणे महामार्ग प्राधिकरण व रोड कॉन्ट्रॅक्टर हे जबाबदार राहतील.
येणाऱ्या १० ते १५ दिवसात वेग कमी करण्यासाठी योग्य ती कामे न केल्यास ग्रामस्थ हे रास्ता रोको आंदोलन करतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार राहाल. निवेदनावर पाळधी गावातील ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments